Posts

"डटे रहो - DO NOT CRACK UNDER PRESSURE"

"डटे रहो - DO NOT CRACK UNDER PRESSURE"  '"Experience Beyond Cup" या मिशन सहित खरोखर एका नवीन पर्वाला सुरुवात करणारी ही एक कंपनी "Cafe Coffee Day" CCD च्या संस्थापकांनी कर्मचाऱ्यांना पत्र लिहून आपलं मनोगत व्यक्त करून आत्महत्या केली. तो विषय वेगळा आहे समजा , त्यावरिल काही बाबी समोर येतीलच. पण, कशी उभारली गेली ही कंपनी ? समजून घ्या, 20,000 एकर स्वतःचे कॉफी मळे 1772  ठिकाणी रेस्टो 20,000 कर्मचारी 6 देशांमध्ये ऑपरेशन्स 43.31 billion Dollars चा Revenue 1.8 billion Cups वार्षीक विक्री.. असा भला मोठा विस्तार असलेल्या या कंपनीची सुरुवात कृषी उत्पन्न समिती मध्ये , कॉफीची बीजे विकण्यापासून झाली होती . यांनी "Vertical integration" हे बिझनेस चे मॉडेल अवलंबले . ज्याचा मराठीत सरळ साधा अर्थ सांगायचा म्हटलं तर, "आपण पिकवलेलं आपणच विकायाचं" असा होतो . सिद्धार्थ यांनी कॉफीची बिजे कच्च्या स्वरूपात इंडीयन कॉफी बोर्ड ला विकण्याऐवजी त्यांना भाजून पावडर करून , "fresh & Ground " या Outlet मधून सरळ ग्राहकांना विक्री क...

मुलांना समजदार करायचे आहे ? मग, चार मिनिटे वेळ काढून वाचा !

मुलांना समजदार करायचे आहे ? मग, चार मिनिटे वेळ काढून वाचा ! एका गावात असाच एक दुकानदार असतो. त्याचा मुलगाही खूप आळशी असतो. त्याचा आळस घालवून त्याने दुकानात लक्ष घालावे म्हणून दुकानदार एक आयडिया करतो. तो एके सकाळी मुलाला म्हणतो, "आज संध्याकाळपर्यंत काहीतरी कमावून आण, नाहीतर संध्याकाळचे जेवण मिळणार नाही." मुलगा दचकतो. कारण कामाची, कमाईची अशी वेळ आलेली नसते. तो रडक्या चेहऱ्याने आईकडे जातो. वडीलांनी काय सांगितलेय तेही सांगतो. त्याचा रडका चेहरा पाहून आईला दया येते. ती तिच्याजवळची शंभरची नोट काढून त्याला देते आणि म्हणते की, हीच संध्याकाळी वडीलांना दे" त्याप्रमाणे संध्याकाळी मुलगा ती नोट वडीलांना देतो. वडील ते पाहून हसतात. म्हणतात, "ठीकाय. आता ही नोट घरासमोरच्या कचरा कुंडीत टाकून ये". मुलगा त्याप्रमाणे ती नोट कचरा कुंडीत टाकून येतो. दुसऱ्या दिवशी दुकानदार आपल्या बायकोला माहेरी पाठवतो. आणि मुलाला पुन्हा सांगतो, "आज संध्याकाळपर्यंत काहीतरी कमावून आण, नाहीतर संध्याकाळचे जेवण मिळणार नाही." आता आई तर घरी नसते. मग तो आळशी मुलगा मोठ्या बहिणीकडे जातो...

RIP ....... काय आहे हे .....RIP?

RIP काय  आहे हे RIP? Rest in peace चा खरा अर्थ जाणून घ्या. सध्या कुणाचाही मृत्यू झाला की आपल्याकडे RIP लिहून श्रध्दांजली वाहू लागलेत. अगदी विद्वान-विदुषीसुध्दा या 'फॅशनचे बळी' आहेत. आपण काय 'भयानक' लिहितोय किती 'विनाशकारी' बोलतोय याबद्दल कुणालाच कसे काही वाटत नाही ? जन्मापासूनच इंग्रजांचे गुलाम असलेल्यांनो तुमचा मृत्यूसुध्दा इंग्रजांचा गुलाम झालाय का ? तुम्हांला गाडतात की जाळतात ?  कृपया हिंदू माणसाला, त्याच्या मृत्यूवर RIP लिहून श्रध्दांजली वाहू नका. ज्यांना मृत्यूनंतर जमिनीत गाडले जाते त्या मुस्लिम, ख्रिश्चन धर्माच्या बांधवांत RIP म्हणण्याची प्रथा आहे. RIP म्हणजे rest in peace. कृपया हिंदू माणसाच्या जाण्यावर असे लिहू नका. "जगात कुणीही असो एकदा तो वारला की त्याच्या धर्माप्रमाणे त्याच्यावर शेवटची कर्मे करणे हा त्या 'जाणाऱ्याचा' हक्क आहे." हे कुणाचे उदगार आहेत ? ठावूक आहे ? छत्रपती शिवरायांनी अफझल खानाचा कोथळा काढला तेव्हा मेलेल्या अफझल्याच्या देहाला मावळे जाळायला निघाले. अशावेळी शिवरायांनी विरोध केला. अफझल खान मेला तेव्हा त्याची दुश...

तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का ??? एका स्त्री चे अफलातून उत्तर !!!

तुमचा नवरा तुम्हाला आनंदी ठेवतो का ??? एका स्त्री चे अफलातून उत्तर !!! एकदा एका वक्त्याने श्रोत्यांमधील एका महिलेला विचारले , ” तुमचा नवरा, तुम्हांला आनंदात ठेवतो का ? ” तिच्या शेजारी बसलेल्या पतीच्या चेहऱ्यावर हसू उमटले . तो आत्मविश्वासाने पत्नीकडे बघू लागला . त्याला पूर्ण खात्री होती , की ती ” होच ” असंच म्हणेल . कारण तिने लग्न झाल्यापासून कधीच काहीही तक्रार केलेली नव्हती …. !! पण त्याच्या बायकोने स्पष्ट आवाजात उत्तर दिलं , ” नाही ” ती म्हणाली , ” माझा नवरा, नाही ठेवत मला आनंदात !! ” वक्त्याने विचारले, ” म्हणजे काय, ते तुम्हाला बाहेर फिरायला, हॉटेलमध्ये जेवायला नाही नेत का ?… कधीतरी सरप्राईज, एखादी भेटवस्तू देऊन आनंदात, नाही ठेवत का ? तिच्या पतीला हे अनपेक्षित होतं. कारण इतकी वर्षे, हे सर्व तो तर, कुवतीप्रमाणे आणि योग्य त्या त्या वेळी करत आला होता. त्याला कळजीने घाम फुटला. तेवढ्यात त्याची पत्नी पुढे म्हणाली , ” मला माझ्या नवऱ्याने आनंदात ठेवले नाही , मी स्वत:च आनंदात राहते ….!! ” ” मी आनंदी असावं की नाही याच्याशी, त्याचा काहीच संबंध नाही . माझा आनंद पूर्णपणे माझ्याव...

पोरांना थोडंस घासू द्या ...............

 पोरांना थोडंस घासू द्या   व्यवसायानिमित्त आज नागपुरात आहे... एका बड्या व्यापाऱ्याच्या मुलानी...  संबंध असल्यामुळे "साहाब रुको चाय मंगवाता हू म्हणाला".. आज शॉप मध्ये गर्दी कमी होती म्हणून ...थोड्या व्यावसायिक चर्चा केल्या.....  त्या व्यापाऱ्याच्या मुलानी चहा दिला... मी त्याला विचारले..." आप कोणसी क्लास मे हो " त्यावर तो मुलगा म्हणाला .."सर मै 12th मे हू" मी थोडं खोलात जाऊन ...त्याची दिनचर्या विचारली तेव्हा त्या व्यापाऱ्याच्या मुलाने आपली दिनचर्या सांगितली......... बघा त्यातून काही बोध घेता येईल का....... तो मुलगा आपली दिनचर्या सांगू लागला .......  "सर, मै सवेरे  मॉर्निंग मे 9 बजे शॉप ओपन करता हू.. साथ मे खाणे का टिफिन भी लाता हू,  फिर 11 बजे डायरेक्ट शॉप से कॉलेज जाता हू.... फिर श्याम 5.3 बजे कॉलेज छुटने के बाद मै शॉप पर आता हू..... और 9 बजे शॉप बंद करके... घर मे हम सब जाते है..... मैने पुछा .."पढाई कब करते हो," उस लडके ने कहा रात को और सुबह जलदी उठकर करता हू....." फिर मैने पुछा..." त्योहार को जब छुटी होती है,...

लिमिटेड होतं तेच बरं होतं ...

लिमिटेड होतं तेच बरं होतं ... पूर्वी बहुतांश गोष्टी लिमिटेड होत्या व त्यामुळे आपले आयुष्य किती सुखी होते बघा ..... टी.व्ही.वर 1-2 channels होती व ती पण लिमिटेड वेळेसाठी .... रात्री ठराविक वेळेनंतर बंद व्हायची व घरातील लोकं एकतर झोपायला जायची नाहीतर छान गप्पा मारायची.... 😊😃😁 दोन चाकी वाहनांचे उत्पादन लिमिटेड होते, बुकिंग केल्यावर वर्षा दीड वर्षाने वाहन मिळायचे त्यामुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या लिमिटेड होती.. प्रवासाचा आनंद मिळायचा .... 😄 गोडाधोडाचे पदार्थ फक्त सणासुदीला असायचे व ते पण लिमिटेड त्यामुळे स्थूलतेचे प्रमाण कमी होते.....😉 शाळांमध्ये लिमिटेड अभ्यास असायचा त्यामुळे मुलांना खेळायला वेळ मिळायचा व मुलांची मानसिक व शारीरिक जडण घडण नीट व्ह्यायची... 💪👍 बहुतांश ठिकाणी वर्किंग अवर्स लिमिटेड होते, संध्याकाळी ५-६ च्या दरम्यान ऑफिसेस बंद व्हायची व माणसे वेळीच घरी पोहोचून कुटुंबासाठी वेळ द्यायची...... 👏💞 अशा अजून अनेक गोष्टी आहेत ज्या लिमिटेड होत्या त्यामुळे आपले आयुष्य खूप सुखी होते...... ........... पण आता सगळंच अनलिमिटेड झालंय.... 😢आणि त्यामुळे जीवनातील सुख...

बिलीफ सिस्टीम ! “एकाच वेळी, आनंदी आणि यशस्वी होता येतं का ?”

बिलीफ सिस्टीम !  (आपल्या समजुती) लोक विचारतात, “एकाच वेळी, आनंदी आणि यशस्वी होता येतं का ?” उत्तर :- “आनंदी लोकंच यशस्वी होतात, आणि यशस्वी लोकं तर नेहमीच आनंदी असतात.” मग, प्रश्न पडतो, जगामध्ये आनंदी आणि यशस्वी लोकं इतके कमी का आहेत? त्यांना काय वरुन येताना देवाने काही वेगळी प्रोग्रॅमींग करुन पाठवलेले असते का? शुन्यातुन साम्राज्य निर्माण करणार्‍या लोकांच्या मेंदुत एखादी स्पेशल चीप बसवलेली असते का ? जी त्यांना एक्स्ट्रा ऑर्डीनरी बनवते? धीरुभाई अंबानी म्हटलं की काय आठवतं ? पैसा, प्रगती, झपाटलेपणा, संपत्ती !  तेच जेआरडी टाटा म्हटलं की - पैशासोबतच सचोटी, दानशुरपणा आणि मुल्यांची जपणुक! स्टीव्ह जॉब्ज म्हणजे – गॅझेटच्या जगातली क्रांती ! तेंडूलकर किंवा अमिताभ म्हणजे शिस्त, प्रचंड आणि कठोर परिश्रम ! जगाला प्रदुषणमुक्त करण्याचं स्वप्न बघणारा निकोल टेस्ला माहितीये ? जगप्रसिद्ध व्हर्जिन ग्रुपचा मालक ‘रिचर्ड ब्रॅन्सन’ ? बारा बारा उद्योगामध्ये एक नंबरवर असलेला हा माणुस तुम्हाला नेहमी समुद्रकिनार्‍यावर मजा करताना दिसेल ! ह्या लोकांनी जगाला प्रभावित केलं ह्याचं का...