"डटे रहो - DO NOT CRACK UNDER PRESSURE"

"डटे रहो - DO NOT CRACK UNDER PRESSURE" 


'"Experience Beyond Cup" या मिशन सहित खरोखर एका नवीन पर्वाला सुरुवात करणारी ही एक कंपनी "Cafe Coffee Day"

CCD च्या संस्थापकांनी कर्मचाऱ्यांना पत्र लिहून आपलं मनोगत व्यक्त करून आत्महत्या केली.

तो विषय वेगळा आहे समजा , त्यावरिल काही बाबी समोर येतीलच.

पण, कशी उभारली गेली ही कंपनी ?

समजून घ्या,
20,000 एकर स्वतःचे कॉफी मळे
1772  ठिकाणी रेस्टो
20,000 कर्मचारी
6 देशांमध्ये ऑपरेशन्स
43.31 billion Dollars चा Revenue
1.8 billion Cups वार्षीक विक्री..

असा भला मोठा विस्तार असलेल्या या कंपनीची सुरुवात कृषी उत्पन्न समिती मध्ये , कॉफीची बीजे विकण्यापासून झाली होती .

यांनी "Vertical integration" हे बिझनेस चे मॉडेल अवलंबले .

ज्याचा मराठीत सरळ साधा अर्थ सांगायचा म्हटलं तर, "आपण पिकवलेलं आपणच विकायाचं" असा होतो .

सिद्धार्थ यांनी कॉफीची बिजे कच्च्या स्वरूपात इंडीयन कॉफी बोर्ड ला विकण्याऐवजी त्यांना भाजून पावडर करून , "fresh & Ground " या Outlet मधून सरळ ग्राहकांना विक्री करायला सुरुवात केली हा काळ होता 1994-95.

याच काळात बाहेर देशांमध्ये Starbucks ने यशस्वी स्वरूपात तयार कॉफी विकणारी  आऊटलेट्स चालु केली होती, आणि VG सिद्धार्थ यांच्या ही संधी लक्षात आली.

आपल्या महाराष्ट्रात कितीतरी उद्योग असे होऊ शकतात ज्यात Vertical integration वापरता येईल.

ज्यांनी हे वापरलं ते फार श्रीमंत झालेत.
पुण्याच्या मगरपट्टाचंच उदाहरण घ्या, इंजि. सतिश मगर यांनी, गावकऱ्यांशी बोलुन स्वतःच डेवलप केली का नाही ?

हे होऊ शकतं आपण मनावर घेतलं तर,
पाच रुपयाला सहज मिळणारा तयार कॉफीचा कप सिद्धार्थ यांना पंचवीस रुपयाला विकायचा होता. कॉफी पिण्याचा अनुभव काहीसा वेगळा दयायचा होता  म्हणुन त्यांनी जे पहिलं स्टोर उघडलं त्यावर खर्च केला दीड कोटी.

पन्नास लाख जागेचे अॅडवान्स आणि रेन्ट, पन्नास लाख इंटेरियर आणि पन्नास लाख वर्किंग कॅपीटल.

एका चहा/ कॉफीच्या टपरीसाठी एवढा खर्च ??

यांना मूर्खात काढले गेले, पण लक्षात घ्या, ज्या काळात यांना कॉफी शॉप करायचेच नव्हते, तर अशी फाईव स्टार  जागा तयार करायची होती, जिथे लोक रिलैक्स करायला येतील.

अजून एक गोष्ट, यांनी सॉफ्टवेअर कंपन्यांना मिळतं तसं हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन घेतलं आणि लगत इंटरनेट कॅफे ची संकल्पना मांडली.

अशा प्रकारे cafe Coffee Day ने आपल्याकडे तरूण वर्ग खेचला.

इथे 3A ही संकल्पना पण त्यांनी यशस्वी राबवली.
Affordibility
Accessibility
Accessibility

आणि अशा प्रकारे बेसिक पक्कं करून ही कंपनी पूर्ण दक्षिण भारतात पसरली.

त्यानंतर त्यांचं लक्ष होतं PAN INDIA याचा अर्थ होतो , भारतभर पसरायचं. 2000 सापासूनच याची सुरुवात होऊन आजघडीला भारतातल्या 245 शहरांमध्ये यांची आऊटलेट्स आहेत.

2005 मध्ये यांनी एक धाडसी निर्णय घेतला. "एस्कीमो लोकांना फ्रीज विकण्यासारखा" आणि तो म्हणजे युरोपातील Vienna मध्ये CCD  ची शाखा उघडण्याचा; पण, तो अतिशय यशस्वी झाला आणि CCD हा आंतरराष्ट्रीय ब्रँड बनला.
 खरं तर हे इतकं सोप्प नसतं, पण योग्य रणनीती , प्रोफेशनल मॅनेजमेंट यामुळे हे शक्य झालं .

फक्त कॉफी या एका सेगमेंट वर अवलंबून न रहाता, CCD qअनेक इतर उत्पादने विकते. या अशा सर्व आयडीयाज लावून एक cultural change घडवून आणला.

एवढा सगळा पसारा वाढवताना CCD ला अनेकांकडून funding घ्यावी लागली असेल ,
कारण विस्तार आणि विकास फक्त पोकळ बोलून होत नसतो, त्यासाठी Hard Cash लागते.

अशा फंडींग जरी सोप्या रितीने मिळाल्या तरी त्याचा दबाव फार मोठा असतो.

VG सिद्धार्थ यांनी पत्रात याचाच उल्लेख केलाय, पण या गोष्टी सुरळीत होऊ शकल्या असत्या, अनेक ब्रॅण्डस अगदी माती होऊन परत उभे राहतात.

म्हणून करिता मराठी उद्योजकांनी अधिक खंबीर, अधिक कणखर, आणि अभेद्य राहायला हवे.

यावेळी KBC ची अॅड यावरच आहे.
ते म्हणतात, डटे रहो !

प्रेशर घेऊन जर तडा गेला, तर काय अर्थ आहे ?

Tony Robbins म्हणतो . " प्रेशर मुळे पाण्याचे पाईप फुटतात मान्य ! पण प्रेशरमुळेच कोळश्याचे रूपांतर हिऱ्यात होते "

त्यामुळे प्रेशर नीट हाताळा , काही बिघडत नाही .

उद्योजक जग चालवतात आणि  त्यांचेच पाय अडखळले तर कसे होईल ??

Comments