मंदी का आहे व्यापारात ?

मंदी का आहे व्यापारात ? 

1) भांड्याचा व्यापारी परिवारासाठी चप्पल ऑनलाइन खरेदी करत आहे.
2) चप्पलचा व्यापारी परिवारासाठी मोबाइल ऑनलाइन खरेदी करत आहे.
3) मोबाइलचा व्यापारी परिवारासाठी कपडे ऑनलाइन खरेदी करत आहे.
4) कपड्याचा व्यापारी परिवारासाठी घड्याळ ऑनलाइन खरेदी करत आहे.
5) घड्याळाचा व्यापारी मुलांकरीता खेळणे ऑनलाइन खरेदी करत आहे.
6) खेळण्यांचा व्यापारी घराकरीता भांडी ऑनलाइन खरेदी करत आहे.
7) आणि हे सर्व व्यापारी रोज सकाळी दुकान खोलून अगरबत्ती लावून देवाला प्रार्थना करतात  धंदा चांगला होऊ दे.
८) कुठुन होणार विक्री ???
९) खरीददार आकाशातून तर येणार नाही ना ?
10) आपण एक दुसऱ्याचे सामान खरेदी करुन बाजार चालवितो.
11) कारण प्रत्येक व्यक्ती काहीना काही विकतो आणि प्रत्येक व्यक्ती काही ना काही खरेदी करतो.
12) ऑनलाइन खरेदी करून आपण भले ५० अथवा १०० रुपयांची बचत करु पण सर्व नफा मोठ मोठ्या कंपन्या आणि त्याही विदेशी कंपन्यांनाच मिळणार.
१३) या कंपन्या मुठ्ठीभर कर्मचाऱ्यांच्या बळावर बाजारातील खुप मोठ्या भागावर कब्जा करून बेरोजगारी निर्माण करत आहेत.
14) यामुळे छोटे-मोठे दुकानदार, व्यापारी यांचे खूप नुकसान होत आहे.
15) जर आपण विचार करत असाल की मी दुकानदार नाही किंवा व्यापारीही नाही, मी तर नोकरी करतो, ऑनलाइन खरेदी ने माझा वेळ वाचतो आणि फायदाही होत आहे तर आपण सरासर चूक आहात.
16) कारण समाजात जेव्हा आर्थिक असमानता वाढते किंवा देशातील पैसा देशा बाहेर जातो तेव्हा देशातील प्रत्येक व्यक्तिला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपात नुकसान सहन करावे लागते, मग तो गरीब असो अथवा श्रीमंत, नोकरीवाला असो किंवा दुकानदार.
17) भले २ पैसे जास्त जाऊदे पण आपल्या माणसाला मिळेल ही भावना ठेवा ..
जर अॉनलाइन खरेदी बंद झाल्यास सर्वाचा व्यवहार व्यवस्थित चालेल आणि मंदी संपेल
🙏
आज आपण discount च्या  आशेने  amazon व D Mart  सारख्या मॉल मधून खरेदी करतो
पण यातून एकच व्यक्ती किंवा संस्था श्रीमंत होते
    पण जेव्हा आपण अनेक किरकोळ दुकानदारांकडून खरेदी करतो तेव्हा आपल्या  थोड्याश्या नफ्यानें अनेक घरातील कुंटुंबांची जेवणाची व्यवस्था करतो,
      आपण ज्या समाजात राहतो त्यातील प्रत्येकानेच आपल्या समाज बांधवांची काळजी घेतली पाहिजे , थोडा स्वार्थ बाजूला ठेऊन आपणच एकमेकांना। आधार दिला पाहिजे.
         खासगी दुकानदारांनी पण मॉल चे आव्हान लक्षात घेऊन आपली सेवा सुधारली पाहिजे किमान मापात पाप तरी नको .
     उदया आपण अडचणीत असलो तरी आपल्याला कोपऱ्यावरचा दुकानदार उधारीवर माल देईल मॉल मधे तुम्हाला कोण उभे करणार नाही.
तुमच्या मयताला amazon व फ्लिपकार्ट चा मालक अश्रू ढाळायला किंवा खांदा द्यायला येणार नाही
नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी सामान्य माणूसच सामान्य माणसाच्या उपयोगी पडला आहे तेव्हा कॉर्पोरेट कंपन्या मदतीला आल्या नाहीत हे आजवरचा इतिहास आहे
             तेंव्हा
      एकमेका साहाय्य करू
              अवघे धरू सुपंथ।
          हा मंत्र मनी धरू।

Comments